उमरगा (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील भुसानी व येणेगुर या गावांमध्ये “होऊ द्या चर्चा करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड“ या अभियानाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील जनतेची भाजप प्रणित  सरकारने कशी व कोणत्या पद्धतीने फसवणूक केली आहे याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चालू आहे असे मत संपर्क प्रमुख नंदूराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना भाजप प्रणित मोदी सरकारने मागील नऊ वर्षाच्या काळात किती आश्वासने दिली व त्यापैकी किती सत्यात आली तसेच महागाई वाढली, देशावरील कर्ज वाढले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहिले नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, सुरळीत वीजपुरवठा नाही, दुधाला भाव नाही,  बेरोजगारी संपली नाही, महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, इंधनाचे दर वाढले यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करून सर्व गोष्टीची माहिती देऊन याची चर्चा आपल्या गावातील वाडी, वस्ती,मंदिर, पारावर शहरातील प्रत्येक वार्डात, घरोघरी या ठिकाणी चर्चा करून मोदी सरकारच्या बोलघेवढ्या योजनांचा भांडाफोड करून मतदारांना बोलण्याचे आवाहन केले..

याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या समवेत मी तसेच उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रज्जाक भाई अत्तार, कृ.उ.बाजार समिती सभापती रणधीर भाऊ पवार, विरपक्ष स्वामी, विजय नागने, सुधाकर पाटील, अजित चौधरी, संतोष कलशेट्टी, रवी कोरे, जगदीश मिकरेंगे, परमेश्वर मंडले, युवराज मंडले,आप्पाराव गायकवाड आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top