धाराशिव (प्रतिनिधी)-कंचेश्वर साखर कारखान्याने ऊस गळीत हंगाम 2022-23 मधील सांजा गावातील शेतकऱ्यांना प्रति टन 2500 रुपये भाव देण्याचे ठरवले होते म्हणून जवळपास 150 शेतकऱ्यांनी तीनशे एकर ऊस कारखान्यास गाळपासाठी दिला होता परंतु ठरल्याप्रमाणे भाव न देता प्रति टन 2300 रुपये भावाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली उर्वरित प्रति टन 200 रुपये न देता शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी (7)रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कंचेश्वर साखर कारखाना मंगरूळ ता.तुळजापूर जिल्हा धाराशिव या साखर कारखान्यावर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व होणाऱ्या आर्थिक फसवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करावी.

प्रती टन 200 रुपये फरकाचे बिल आठ दिवसात शेतकऱ्यांना न दिल्यास कंचेश्वर साखर कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी सांजा गावातील शेतकरी राकेश सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, कल्याण सूर्यवंशी,धनाजी सूर्यवंशी,संताजी सूर्यवंशी,काकासाहेब पाटील,शरद दहिवडकर, दत्तात्रय सूर्यवंशी त्यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


 
Top