धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा कार्यालय धाराशिव येथे (दि.20) सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस पदी सचिन सरवदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार  व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्या मान्यतेने व यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सुनील सरवदे यांना सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याचे पत्र  देण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष यांना सामजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस पदी सचिन सरवदे यांची शिफारस करण्यात आली होती.  यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, युवक जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार उपस्थिती होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय येथे त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, महेश नलावडे, केशेगाव जि.प. गटप्रमुख लिंबराज लोखंडे, धाराशिव विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे, राजू दसाडे, गोरोबा चौगुले कालिदास मुरकुटे, नितीन सरवदे, चंद्रकांत दसाडे, सुनील मते, मंगेश सरवदे, रामेश्वर सरवदे, नितीन शेळके उपस्थित होते.


 
Top