तेर (प्रतिनिधी)- कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानिमीत्ताने धाराशिव तालुक्यातील तेर येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ . सचिन ओंबासे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले तर सुत्रसंचलन मनोज.चौधरी यांनी केले तर प्रविण अवताडे. यांनी आभार मानले. यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे,तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे,प्रा.प्रज्योत वाघ, गोपाळ थोडसरे, दयानंद फंड, सतिश भालेराव, प्रदिप कोकाटे, नंदकुमार खोत,अंगणवाडी पर्यवेक्षिका मनिषा पाटील, पोलिस पाटील फातिमा शेख, राहूल गायकवाड, सुनिल गायकवाड, प्रसन्न पुदाले, मज्जित मनियार, गोरख माळी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.