धाराशीव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन च्या वतीने संस्थाचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना 2018-19 पासुन आर.टी.ई.ची फीस परतावा रक्कम शासनाकडून येणे आल्यामुळे शाळा व संस्था अडचणीत आल्या आहेत.
शासनाने शाळानिहाय आरटीई रक्कम देयकाची माहीती मागवून दिड महिना झाला आहे. शासनाने संस्थाचालकाचा अंत पाहु नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी दिला आहे.
या प्रसंगी संस्थाचालकांच्या व शाळेच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.संस्थाचालकाची एकजूट महत्वाची असून शाळांच्या समस्यांवर मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही तायडे पाटील यानी दिली. सुत्र संचलन शहाजी जाधव यांनी केले तर आभार रामेश्वर यादव यांनी मानले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष नायतखान इनामदार ,जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरडे, कार्याध्यक्ष सय्यद एस.ए., सरचिटणीस शहाजी जाधव, कोषाध्यक्ष भास्कर बोदंर, अमर मगर, तालुकाध्यक्ष रामेश्वर यादव, बालाजी भोसले, एस. एल.पवार, सचिन पाटील, शिवाजी काबले, आनंद बोबडे,धनंजय शहापुरे, दत्तात्रय दिवाणे, अरूण कोलगे, मोरे सर, सचिन टापरे, आबासाहेब रणखाब, जगताप सर, अरूण कदम, सौ.यादव मॅडम, सौ.सय्यद मॅडम आदी पदाधिकारी व संस्थाचालक उपस्थित होते.