वाशी (प्रतिनिधी)- येथील कुलदैवत बहुउद्देशीय सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक महासंघ तालुका वाशी यांच्या वतीने दि. 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर ज्येष्ठा गौरी सणानिमित्त आरास स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी यशस्विनी महिला बचत गटाच्या संचालिका वैशालीताई राहुल मोटे यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले व शाहू महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आले. तसेच वाशी नगरपंचायतच्या अध्यक्षा विजयाताई गायकवाड व नगरसेविका स्मिता गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

त्यानंतर सर्व उपस्थितांचे पुष्पहार, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर बक्षीसांचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक अश्विनी किशोर चौधरी रु एक हजार एक, द्वितीय क्रमांक सौ अंबिका नवनाथ कोळी रूपये सातशे एक्कावन्न व तृतीय क्रमांक आश्लेषा रामहारी कवडे रूपये पाचशे एक तसेच उत्तेजनार्थ रुपये एकशे एक्कावन्नचे बक्षीस वर्षा अनिल ढेरे, भाग्यश्री अतुल पवार व सारिका नाईकनवरे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर परीक्षक म्हणून उत्कृष्ट काम केलेल्या सौ संगीता भांडवले, साधना विश्वेकर व संध्या कोल्हे यांचाही वैशालीताई मोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नंतर गुणवंत विद्यार्थी हर्षल रणदिवे, ऋतुजा जगताप, धवल कवडे, प्रतुशा कवडे, ईश्वरी मोळवणे, अविनाश पाटील, रेणुका हजारे, शशांक सुकाळे, अजिंक्य पवार, इमाद काझी यांचा सत्कार पुष्पहार, श्रीफळ व पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी प्रा.अनिता चिंचोलकर, अनुराधा देवळे व अध्यक्षा वैशालीताई मोटे यांचे महिलांना उत्कृष्ट प्रकारचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाचे संचलन पल्लवी क्षीरसागर यांनी केले तर आभार हारूण काझी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसिका जगताप, सविता जगताप, सुजित जगताप, बळीराम जगताप, हरूण काझी, शाईला मुजावर, एस.एल. पवार व त्यांच्या अजिंक्य विद्या मंदिर शाळेतील मु.अ. मनीषा पवार, संध्या काल्हे, सांडसे मॅडम, निकम मॅडम, शामल कवडे, मोळवणे मॅडम, व क्षीरसागर मॅडम यांनी परिश्रम घेतले.


 
Top