धाराशिव (प्रतिनिधी)-शहरासह जिल्ह्यात मराठा समाजास सरसगट कुनबी आरक्षण देण्यात यावे यामागणीसाठी आंदोलने, रास्ता रोको व उपोषणे सुरू आहेत. उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जाळण्यात आली. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी फौजदारी संहिता 1973 च्या कलम 144 (2) चे संचारबंदीचे आदेश जिल्ह्यात लागू केले आहेत. त्यामुळे धाराशिव शहरासह जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, बाजारपेठ बंद होत्या. दरम्यान, धाराशिव रेल्वे स्थानकावर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी पुणे-लातूर ही इंटरसिटी रेल्वे रोखून धरली. 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र आंदोलनाची धग कायम आहे. ग्रामीण भागातही विविध प्रकाराची आंदोलने होत आहेत. अनेक गावात नेत्यांना व लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजही साखळी उपोषण सुरूच होते. आंदोलनामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


 
Top