धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी 17 दिवस आमरण उपोषण करणारे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनलेले मनोज जरंगे पाटील यांच्या धाराशिव जिल्ह्यात  बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 03:45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब, दुपारी 05:30 वाजता मंगरूळ ,सायंकाळी 07:00 वाजता मोहा ,रात्री 08:00 वा दहिफळ , रात्री 09:00 वाजता येरमाळा, रात्री 09:30 येडशी, रात्री 10:00  वाजता धाराशिव येथे मुक्काम. गुरुवार दि. 05ऑक्टोबर  रोजी सकाळी 09:30 वाजता  धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार आहे. जिल्ह्यातील या विविध ठिकाणच्या सभेसाठी मराठा बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागले असून सभेत जास्तीत जास्त  नागरिकांची गर्दी होईल यासाठी सभेच्या ठिकाणचे नागरिक परिसरातील गावात जाऊन जनजागृती करताना दिसून येत आहेत. या सभेसाठी फुले उधळण्यासाठी  जेसीबी, ट्रॅक्टर, बैलगाडी अशाप्रकारे वेगवेगळ्या वाहनांचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे, जिल्ह्यात भव्यदिव्य स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील मराठा बांधव तयारी करताना दिसून येत आहेत. प्रत्येक ठिकाणच्या आयोजकांनी परिसरातील नागरिकांनी सभेसाठी येण्याचे आवाहन केले आहे.


 
Top