धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद यांनी शेकापूर हद्दीतील एन एच 52 च्या रोड साईडला दिनांक एक ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी  स्वच्छता अभियान राबवले.

यावेळी हायवे च्या बाजूचे गवत काढणे ,प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, प्रा प्रमोद तांबारे (एनएसएस) ,प्रा ज्ञानेश्वर निंबाळकर (रेक्टर ), एस एस घोगरे (वार्डन), सुरक्षा प्रमुख सरवदे, पाटील मॅडम (वार्डन) तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .सदर स्वच्छता अभियानांतर्गत महाविद्यालयाने एआयसीटीइ च्या निर्देशाप्रमाणे दि 1/10/2023 ते दि 15/10/2023 पर्यत स्वच्छता पखवडा आयोजित केला असून , यामध्ये महाविद्यालयाकडून उस्मानाबाद शहर व परिसरातील विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याचे नियोजन केले आहे .या अंतर्गत सिद्धेश्वर मंदिर वडगाव, श्री हातलादेवी मंदिर परिसर, श्री धारासुरमर्दिनी मंदिर परिसर व जिल्हा क्रीडा स्टेडियम तसेच जवाहर आश्रम शाळा, बावी तांडा या परिसरामध्ये स्वच्छता अभियान व प्लास्टिक निर्मूलन हे उपक्रम महाविद्यालयाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत. राबविलेल्या सर्व उपक्रमांचे चित्रे, व्हिडिओ संबंधित वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सांगितले आहे.


 
Top