धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील समाजसेवक तथा उद्योजक गफ्फार शेख यांना सोलापूर येथील आजादी बचाव हिंदी पत्रिकेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा नुरान ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गफ्फार शेख यांचा सत्कार करताना नुरानी ग्रुपचे उपाध्यक्ष मोहम्मद इर्शाद कुरेशी, मौलाना अबुल कलाम आझाद संस्थेचे संस्थापक मौलाना अलीमोद्दिन, चिस्तिया चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन तथा केजीएन ग्रुपचे संस्थापक अय्युबभाई शेख, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ओ.बी.सी संघटना युवा जिल्हाध्यक्ष इम्तियाज बागवान, कादर कुरेशी, बबलुभाई, उद्योजक सत्तार कुरेशी, इम्रान गवंडी आदी उपस्थित होते.