तेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विविध प्रकारचे विविध कलाकार पहावयास मिळतात.अश्याच प्रकारची कला धाराशिव तालुक्यातील किणी येथील विश्वनाथ महामुनी हेही लाकडावर कोरीव काम करून लाकडाचे मुखवटे अत्यंत हूबेहुब करतात.

धाराशिव तालुक्यातील किणी येथील विश्वनाथ महामुनी यांनी लहानपणापासूनच परंपरागत व्यवसाय सुतार काम करीत करीत त्यांना लाकडावर कोरीवकाम काम करण्याची आवड निर्माण झाली. कलाकुसरीला वाव मिळत असल्याने त्यांचे मनोबल वाढतच गेले. त्यामुळे त्याना लाकडावर कोरीवकाम करत करत त्यांनी लाकडावर विविध प्रकारचे मुखवटे व हुबेहूब कलाकृती करण्याची आवड निर्माण झाली..त्यानी लाकडावर लक्ष्मीचे मुखवटे, संत गोरोबा काका, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, राधाकृष्ण, लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी तारेवरला हनुमान देखावा, द्रोणागिरी पर्वत आणणारा हनुमान देखावा त्यांनी तयार केला आहे. त्यानी केलेल्या लाकडावरील कलाकुसर अतिशय हूबेहुब तयार केल्याने प्रत्यक्ष लाकडावरील मुखवटा अतिशय देखनिय दिसतात.ते किर्तनकार, प्रवचनकार ही आहेत.त्यानी लाकडावर केलेली कलाकुसर पहाण्यासाठी आवर्जून नागरिक येत असतात.


 
Top