धाराशिव (प्रतिनिधी ) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील19 वर्षे वयोगटातील मुलींचा संघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर विभागीय शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेसाठी वडगाव सिद्धेश्वर ता. जि. उस्मानाबाद येथे पाठविण्यात आला होता. या स्पर्धेत रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या 19 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. या संघाची राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा 2023 - 24 साठी लातूर विभागातून निवड करण्यात आली.
याबद्धल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी सर्व खेळाडू मुलींचे व मार्गदर्शक दत्तात्रय जावळे यांचे पुष्प देऊन अभिनंदन केले आणि पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.