तुळजापूर (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी मातेचा दर्शन मंडप हा मंदीरा समोर प्रशासकीय जागे लगत व्हावा असा कौल जनमत चाचणीत आल्याने आपल्या जन मताचा आदर केला जाईल अशी घोषणा आ. राणाजगजितसिंह पाटील आदर सर्व जनमतांचा विकास श्रीक्षेत्र तुळजापूरचा या उपक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या जनमत कौल चाचणी निकाल जाहीर कार्यक्रमात केला.
शुक्रवार सांयकाळी राजेशहाजी महाध्दार समोर झालेल्या या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बाळासाहेब शिंदे, सचिन रोचकरी पुजारी मंडळ उपाध्यक्ष सचिन रोचकरी, विपीन शिंदे सह परिक्षक यावेळी उपस्थितीत होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले या जनमत कौल मध्ये 4266 जणांनी सहभाग नोंदवला. त्या पैकी 2009 जणांनी म्हणजे 60 टक्के मंडळीनी मंदिर समोर प्रशासकीय इमारत उंबरझरा येथे दर्शन मंडप उभारावा असा कौल दिला. जनमतचा आदर घेवुनच विकास करणार असल्याचे शेवटी म्हणाले. तसेच टोळबा दरवाजा लवकरच खुले केला जाईल असे यावेळी जाहीर केले.
या जनमत कौलचे आयोजन विनोद गंगणे. सचिन रोचकरी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन आनंद कंदले यांनी केले. यावेळी नरेश अमृतराव शांताराम पेंदे पंडितराव जगदाळे विशाल छञे, प्रकाश मगर, गुड्डु कदम, नितीन मुर्तडक, सुहास सांळुके, गुलचंद व्यवहारे, सागर पारडेसह पुजारी व्यापारी शहरवासिय भाजप पदाधिकारी नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.