उमरगा (प्रतिनिधी)-मुरूम येथील श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2023-24 साठीचा गळीत हंगामाचा मोळी पुजनाचा कार्यक्रम चेअरमन व माजी मंत्री बसवराज पाटील  यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर आज रोजी संपन्न झाला.

 चेअरमन  पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 23 गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडले असून चालू हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच पुरेसी वाहतुक यंत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता असून कारखान्याच्या संचालक मंडळाने 5 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सदर हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील  यांनी यावेळेस दिली. 

याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन बापुराव पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादीक काझी, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, तसेच कारखान्याचे संचालक विट्ठलराव पाटील, सुभाष राजोळे, केशवराव पवार, शब्बीर जमादार, रामकृष्ण खरोसेकर, दिलीप पाटील, शरणाप्पा पत्रिके, संगमेश्वर घाळे, राजीब हेबळे, विठ्ठलराव बदोले, माणिकराव राठोड, दत्तू भालेराव, शिवलींग माळी, शिवमुर्ती मांडेकर, ॲड. संजय बिराजदार, ॲड. विरसंगप्पा आळंगे, सुभाषचंद्र पाटील तसेच प्रा. दिलीप गरूड, विजयकुमार सोनवणे, विलास शाळु पप्पू सगर, अभिषेक गुज्जर, आवघुत क्षिरसागर, रशिद शेख, दिपक मुळे, राजु तोडकरे, प्रा.शौकत पटेल, विजय वाघमारे, चंद्रशेखर पवार देवेद्र कंटेकुरे, गोविंद पाटील, भरडे रफिक तांबोळी. महेश माशाळकर, योगेश राठोड, महालिंग बाबशेटटी, सचिन पाटील, हरी लांखडे, व्यंकट कोरे, आदी मान्यवर कार्यकारी संचालक एम. बी. अथणी व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.


 
Top