धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील गणेश नगर येथील विधिज्ञ गजानन चौगुले यांच्या निवासी गायक अभिनेता दिग्दर्शक स्व. किशोर कुमार यांना कलाविष्कार अकादमी द्वारा हौशी छंदी गायक समूह मेलडी च्या वतीने गायनातून अभिवादन केले. प्रथम प्रतिमा पुजन करण्यात आले त्यानंतर समुहाचे प्रवर्तक युवराज नळे समन्वयक रवींद्र कुलकर्णी, कलाध्यापक शेषनाथ वाघ, शरद वडगावकर, तौफीक शेख, विधिज्ञ गजानन चौगुले, महेश उंबर्गीकर, चंद्रकांत पाटील, राजाभाऊ कारंडे, धनंजय कुलकर्णी, गाडे, नितीन बनसोडे, सौ.वर्षा नळे, प्रगती शेरखाने, नंदिनी गाडे सर्वांनी किशोर कुमार यांनी गायलेले गाणी गायन केले. गजानन चौगुले यांच्या प्रसायदानाने सांगता केली.