धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि धाराशिवचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी गोविंद देवकर यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय.अजित पवार यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष.खा.सुनील तटकरे  यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे पुरोगामी विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार तालुक्यातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास गोविंद देवकर यांनी व्यक्त केला.

यावेळी युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, वाशीचे तालुकाध्यक्ष ॲड. सूर्यकांत सांडसे, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, युवक प्रदेश सरचिटणीस शंतनू खंदारे, जिल्हा सरचिटणीस शमसोद्दीन जमादार, युवक जिल्हा सचिव सुदर्शन करंजकर ,कळंब युवक तालुकाध्यक्ष अमर मडके, वाशी युवक तालुकाध्यक्ष अविनाश काटवटे, कळंब शहर युवक अध्यक्ष विक्रम चोंदे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, धाराशिव शहर युवक कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, सुशिल शेळके,सुरेश पाटील, रवींद्र नलावडे आधी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top