धाराशिव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पुर्व मराठावाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या  प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश भाजपा किसान मोर्चाचे प्रभारी तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर,किसान मोर्चाचे प्रभारी ज्ञानोबा मुंडे यांच्या मान्यतेने भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच विभागनिहाय पदाधिकाऱ्याच्या निवडी केल्या आहेत यामध्ये 17 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस,18 प्रदेश सचिव,9 सोशल मिडीया प्रमुख व 18 पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणुन निवड करण्या आली आहे मराठवाडयातुन प्रदेश सचिवपदी म्हणुन पाच जणांना संधी देण्यात आली आहे यामध्ये रूईभर ता.धाराशिव येथील रहिवाशी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य  रामदास  कोळगे यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिवपदी रामदास कोळगे यांची निवडीने जिल्हयातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, किसान मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच  शेतकरी, शेतमजुर व सर्वसामन्यांतुन आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीने सर्वच स्तरातुन अभिनंदन व्यक्त होत आहे|


 
Top