उमरगा (प्रतिनिधी)-एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत साखळी उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असतानाच उमरगा व कवठा येथे अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. गुंजोटी येथील उपोषणात लहान बालकासह महिलांनी सहभाग नोंदवला. तालुक्यातील सहा गावांतील साखळी उपोषणाला उदंड प्रतिसाद मिळत असून उमरगा येथे अमरण उपोषण सुरू झाले आहे. कवठा येथील अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तालुक्यातील 43 गावात आजी - माजी मंत्री, खासदार व आमदारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठयांना सगसगट ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारपासुन उमरगा येथे साखळी उपोषण सुरू आहे. आरक्षणाचा लढा तीव्र करण्याच्या दृष्टीने पाच टीम करुन संपूर्ण तालुक्यात जनजागृती करण्यात येत आहे. माडज, गुगळगाव, कोरेगाव व वागदरी येथील मराठा बांधवानी शहरातून रॅलीद्वारे घोषणा देत येऊन उपोषणात सहभाग घेतला. 

गुंजोटी, कोराळ, कदेर, मुरुम, तुगाव व तलमोड या सहा गावातील उपोषणाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. कवठा येथे विनायकराव पाटील यांचा आज अमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तालुक्यातील 43 गावात आजी-माजी मंत्री, खासदार व आमदारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गुंजोटीत सार्थक चौगुले, सोनाक्षी शिंदे,  आर्यन पाटील, विक्रांत साळुंके, अथर्व गायकवाड, आर्यन शिंदे, प्रसाद सूर्यवंशी, साईराज जाधव, गणेश शिंदे, कृष्णा शिंदे, समृद्धी पाटील, योगिता पाटील, अरुणा गायकवाड, वर्षाताई गायकवाड, अश्विनी दीपक चौगुले, छबुबाई पाटील, उषा पाटील, मंजुषा चव्हाण, रेणुका शिंदे, मीनाक्षी भोसले, संजीवन गायकवाड, संतोष जाधव, ओमराजे पाटील, विशाल घारगे हे उपोषणार्थी होते.


 
Top