धाराशिव (प्रतिनिधी)- भारताला महासत्ता बनवण्यास उद्योजकता विकास आवश्यक असून अभियांत्रिकीचे विद्यार्थी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन , पी आर ऑटोचे प्रमुख संचालक अजिंक्य काळे यांनी केले. येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “मेसा 2023“ ( मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनचे) उद्घाटन अजिंक्य काळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने , अकॅडमीक डीन आणि विभाग प्रमुख डॉ.डी. डी. दाते यांची  प्रमुख उपस्थिती होती.  या प्रसंगी बोलताना अजिंक्य काळे पुढे म्हणाले की, भारताचा विकास करायचा असेल तर अभियंत्याला केंद्रबिंदू मानून त्याच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच भारतातील पायाभूत सुविधा , कुशल कामगार व भारतीयांची कुशाग्र बुद्धिमत्ता जर उद्योगांमध्ये आली तर लवकरात लवकर भारत जगातील एक प्रबळ महासत्ता म्हणून उभा राहील. त्यांनी भारतातील मनुष्यबळाचा वापर हा फक्त कोणत्याही वस्तू भारतातच बनविण्यासाठी झाला पाहिजे. तसेच येथील कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी हे इतरत्र न जाता त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर भारतीयांच्या सेवेसाठीच केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.  स्वतः कसे मोठे व्हायचे याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी कानमंत्र दिला. यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, मेसाच्या पहिल्याच उद्घाटन कार्यक्रमाला अजिंक्य काळे यांना बोलावून विद्यार्थ्यांना व्याख्यानाची एक उत्तम संधी दिल्याबद्दल त्यांनी विभाग प्रमुख यांचे विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते  यांनी मेसाच्या पदाधिकाऱ्यांची कर्तव्य, जबाबदारी याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. उद्योजकता विकासाचा आधार घेऊन मेकॅनिकल शाखेच्या 26 विद्यार्थ्यांनी “तिफन-2024 “आयोजित स्पर्धेसाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अद्यावत अशी यंत्रे व अवजारे बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. याचा उपयोग जॉनडियर, टीसीएस व महिंद्रा अँड महिंद्रा  विल्स इंडिया लिमिटेड या सारख्या कंपन्या मध्ये निवडीसाठी होणार आहे.

या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत कोल्हे, डॉ. उषा वडने, प्रा. सुजाता गायकवाड, प्रा. शितल पवार, प्रा. बी एम पवार, डॉ गणेश मते,प्रा. योगिता अजमेरा, प्रा. सुनीता गुंजाळ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रा.आर एम शेख, प्रा.एस पी बिराजदार, मेसाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top