धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शहरात रविवारी रात्री मराठा समाजाच्या वतीने मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला व युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता बंद झाला होता. मेणबत्त्यांसोबतच मोबाईलचे टॉर्च लावून अनेक जण या मोर्चात सहभागी झाले. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं... अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.