धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, महासचिव माऊली सलगर,  मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य आश्रुबा कोळेकर  यांच्या मार्गदशानाखाली जिल्हाध्यक्ष बालाजी भारत वगरे यांनी दि.30 ऑक्टोबर रोजी धाराशिव येथे रासपाची बैठक घेऊन शहर कार्यकारिणीचे गठण केले.

कार्यकारिणीत सलिम अब्दुलरहेमान पठाण यांची धाराशिव शहाराध्यक्ष, विद्याधर बबनराव क्षिरसागर यांची युवक शहाराध्यक्ष पदी तर रज्जाक बगाड तांबोळी धाराशिव अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.सदर बैठकीस ल युवक जिल्हाध्यक्ष आण्णा बंडगर, विधी व न्याय विभाग जिल्हाध्यक्ष ॲड.शमशोद्दीन सय्यद, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष जमिर पठाण, तालुकाध्यक्ष सचिन देवकते, अक्षय पांढरे, आकाश क्षिरसागर, बालाजी माने, चंदर पोंदे, अशोक गाडेकर, राजेश मेटकरी, तुकाराम घोडके, बापू भंडगे, तुकाराम जावळे, विनोद कुलकर्णी, श्रीकांत घोडके आदि उपस्थित होते.


 
Top