तुळजापूर (प्रतिनिधी)- देशभरात अकरा राज्यात शाखांचे जाळे असणाऱ्या  रेणुका माता मल्टी स्टेट अर्बन बँकेच्या शाखेचा शुभारंभ मंगळवार  दि. 10 रोजी मराठा वनवास याञेचे प्रमुख  योगेश केदार यांच्या शुभहस्ते  बोरगावकर काँम्प्लेक्स नळदुर्ग रोड येथे   करण्यात  आले                  

या प्रसंगी रेणुकामाता मल्टीचे वरिष्ठ अडमिन कार्तिक जी, मॅनेजर महेश केदार बँक पी.ओ. नितीन पवार व राजू जाधव उपस्थित होते. रेणुका माता मल्टी स्टेट अर्बन बँकेच्या

देशभर 11 राज्यात शाखांचे जाळे निर्माण केलेली ही क्रेडिट बँक  आहे. जवळपास सत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यवसाय आहे.  येणाऱ्या काळात तुळजापूर शहर व तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांना व तसेच शेतकऱ्यांना सुलभ पत पुरवठा करण्याची योजना सदर बँकेची आहे.


 
Top