तुळजापूर (प्रतिनिधी)-कुलस्वामिनीचे मंदिर नवराञोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाई ने उजळुन निघावे या हेतुन उंडाळे व टोळगे परिवार गेली अकरा वर्षापासुन ही सेवा करीत आहे. शिवराज्य अभिषेक सोहळा विद्युत रोषणई करण्याची संकल्पना सिंगापूरला गेल्या तेथील निघालेल्या रँली तील विद्युत रोषणाईतुन सुचली व यंदा छञपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्य अभिषेक सोहळास 350  वर्ष पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने शिवराज्य अभिषेक सोहळा देखावा विद्युत रुपात सादर करण्याचे ठरले व तो सादर केला जात आहे. हा वर्षभर पाहण्यासाठी उपलब्ध असणार असल्याची माहीती संजय टोळगे यांनी दिली.


 
Top