तुळजापूर (प्रतिनिधी) -  सकल  मराठा समाजाचा वतीने मंगळवार सकाळी शहरातील विविध कार्यालयांना टाळे ठोकुन जुन्या बसस्थानक समोरील चौकात मुखमंञी व दोन्ही उपमुखमंञी पुतळ्याचे दहन करुन रस्ता रोको आंदोलन केले.         

यावेळी मराठा समाजाला आरक्षण प्रकरणी सरकार बघ्याची भुमिका घेत असल्याने  मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असुन राज्यपाल यांनी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवुन  मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावावा. तसेच जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आंदोलन स्थळी मनोगत व्यक्त करताना दिला.                    

मंगळवार सकाळी छञपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ सकल मराठा समाजाचे हजारो कार्यकते जमुन तेथुन पंचायत समिती नगरपरिषद तहसिलदार कार्यालयांना टाळे ठोकले. नंतर महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करुन नंतर जुन्या बसस्थानक महामार्ग रस्त्यावर आले. येथे रस्तारोको आंदोलन सुरु केले. यावेळी मुखमंञी एकनाथ शिंदे, उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस, अजितपवार यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी चोहीबाजुन वाहनांचा रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शासन प्रतिनिधीना दिले. यावेळी सकल मराठा समाजाचे हजारो कार्यकते उपस्थितीत होते. या आंदोलनास मुस्लीम समाज व वंचित बहुजन आघाडीने सहभाग नोंदवुन पाठींबा दिला.


 
Top