नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे श्री छञपती शिवाजी महाराज शौर्य जनजागरण याञेचे भव्य स्वागत करण्यात आले.

अखंड हिंदुस्थानचे अराध्य दैवत श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेस 360 वर्षे पुर्ण होत आहेत. तसेच हिंदु  धर्म कल्याणासाठी अहोराञ कार्य करणाऱ्या विश्व हिंदु परीषद या संघटनेस 60 वर्ष पुर्ण होत आहेत या दोन्ही विशेष प्रसंगाचे औचित्य साधुन छञपती शिवरायांचे अलौकिक कार्यकर्तृत्व व शौर्याची माहिती तळागाळातील जनते पर्यत  पोहचविण्याकरीता जनजागृती करत ही याञा संपुर्ण देशभरातुन निघत आहे. धाराशिव जिल्ह्यातुन दोन याञा दि.1 ते 7 ऑक्टोबर 2023 या कालावधीत निघाल्या आहेत.यापैकी एक याञा अचलबेट ते धाराशिव मार्गेजात आहे ती नळदुर्ग येथे दि.3 ऑक्टोबर रोजी दाखल झाली. या शौर्य यात्रेचे पुजन

गजानन कुलकर्णी,रोहित मोटे,बलभीमराव मुळे गुरुजी,बाबुराव पोतदार गुरुजी,श्री.बिसेनी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे पूजन करून बालाघाट कॉलेज समोरील  इच्छापुर्ती हनुमान मंदिरापासून शौर्य जागरण यात्रेची सुरुवात झाली.यात्रेचे ठीक ठिकाणी फुले उधळून स्वागत करण्यात आले.बस स्थानकासमोर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.जय भवानी चौक रांगोळी ने सुशोभित करण्यात आला होता . जय भवानी  चौक, धर्मवीर संभाजी चौक, गवळी गल्ली,पारायण कट्टा, येथे मुला मुलींनी लाठी काठी फिरवण्याची चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. यात्रा शहरातील मिरवणुक मार्गाने काढण्यात आली.शेवटी जयभवानी चौकात देव,देश धर्माची तरुणांना शपथ देण्यात आली व यात्रेची सांगता रामतीर्थ येथे प्रभु श्रीरामाच्या दर्शनाने झाली.  या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विविध शाखेचे बजरंग दल ,विश्व हिंदु परीषद व शिव प्रतिष्ठान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top