धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील गावसुद येथे दि.09 आक्टोंबर 2023 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

गावसुद येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 698 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 141 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे उपसरपंच श्रीमती मंगल भोसले, नितीनजी काळे साहेब, हिम्मत भोसले, गणेश एडके, प्रमोद पाटील, ओम नाईकवाडी, ग्रा. सेवक कदम, पपीन भोसले, शाम तेरकर, श्रींकात तेरकर, बालाजी तेरकर, दया भोसले, संदिप भोसले, आप्पासाहेब घायाळ नाना सगर, सतिश भोसले इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. श्रुती सांगवी, डॉ. धनवी पारेख, डॉ. दृष्टी शहा, डॉ. रिया जैन, डॉ. श्रेया कातीरा यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमीन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चौरे मॅडम व आशा कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.


 
Top