उमरगा (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेचे दोन वर्षापासुनची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. मोठया प्रमाणावर विकास निधी मंजूर झाला असला तरी उपविभागीय अभियंता पदावर सात महिन्यांपासून प्रभारीराज आहे. अंदाजपत्रकातील त्रुटी, माहिती देण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने व अधिका-यावर असलेला ठराविक लोकांचा पगडा यामुळे एकंदरीत कारभार गोंधळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून डिप्लोमा होल्डरच्या हातात दोन तालुक्याचा कारभार सोपवल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे जि. प. सीओ व गटविकास अधिकाऱ्यांनी शिस्त लावण्याची गरज आहे.

कोरोनानंतर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकराज असल्याने दोन वर्षांपासून विकासकामे रखडली होती. विकासनिधी परत जातो की काय अशी परिस्थिती असताना पालकमंत्र्यांच्या दट्टयानंतर 30 मार्चला रातोरात निधी वाटपाला मंजूरी देण्यात आली. तब्बल दोन वर्षाच्या निधी वाटपाला एखा झटक्यात मान्यता मिळाली. डांबरी रस्ते, सिमेंट रस्ते, समाजमंदिर, गटारी, शाळा, अंगणवाडी व स्मशानभूमी कामे मोठया प्रमाणावर मंजूर करण्यात आली आहेत. विक्रमी विकासनिधी येऊनही विविध योजना राबवण्यासाठी सक्षम व पात्रतेचा अधिकारी नसल्याने विकास कामाचा खेळखंडोबा होत आहे. गेल्या सात महिन्यापासून कारभार प्रभारीराजवर सुरू आहे. उपविभागीय अभियंता पदासाठी किमान पदवीधर असणे गरजेचे आहे. उपविभागीय अभियंता चिडगोपकर यांची लातुरला पदोन्नती झाल्यानंतर माहे मार्चमध्ये  धाराशिवचे उपविभागीय अभियंता  जरीचंदश सावंत याच्याकडे उमरगा उपविभागीय अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार आला. नको त्याचे मार्गदर्शन आणि वरीष्ठ अधिका-यासोबत घेतलेला पंगा यामुळे त्यांचा अतिरिक्त पदभार काढण्यात आला. 


 
Top