धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कनगरा येथे दि. 17 आक्टोंबर 2023 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

कनगरा येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 602 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 95 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे प. स. सदस्य मा. उपसरपंच संजय दळवे, मा.ग्रा.प.सदस्य महेबुब शेख, मा. ग्रा.प. सदस्य कमलाकर दळवे, श्रीधर इंगळे, वामन दळवे, संतोष कांबळे, मारुती चंडके, विठ्ठल सुरवसे, अशोक इंगळे, अजित पवार, तानाजी गायकवाड, निळकंट पाटील इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. ओम खानापूरे, डॉ. मयुर पाटील, डॉ. शैलेश खंदारे, डॉ. धन्वी मोरे, डॉ. निधी परदेशी यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे कनगरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ अनसारी मॅडम,  भिंगडे सिस्टर व आशा कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.


 
Top