तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीकडून अन्यायी निर्दयी राजवट उलटविण्यासाठी आशिर्वाद रुपी भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराज, यांना देणारी भवानी तलवार महालंकार पूजा शनिवार दि. 21 ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मांडण्यात आली.
ही महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या हिंदुहृदयसम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचा माता तुळजाभवानीप्रति असलेला भक्तीभाव यातुन प्रकट होतो. श्री कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीकडून भवानी तलवार स्वीकारताना छत्रपती शिवाजी महाराज, या दृश्यातील भवानी तलवार महालंकार पूजा या पूजेला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असून त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षणीय दिसून आली. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात झालेल्या. या महापूजेनंतर लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. शारदीय नवरात्रोत्सवातील तुळजाभवानी अलंकार महापूजा पाहण्यासाठी मंदिरात सुमारे ऐक लाख भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने तुळजाईनगरी दुमदुमून गेली होती. भवानी तलवार पूजेच्या कालावधीत जय भवानी जय शिवाजी आई राजा उदो ऽऽ उदोच्या गर्जनांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता. तत्पुर्वी सहाव्या माळे दिनी शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर प्रांगणात राञी दहा वाजता सिंह वाहनावर छबिना काढण्यात आला. नंतर महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ पुजा केल्यानंतर सहाव्या माळेच्या धार्मिक विधीचा सांगता झाला.