धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर  हे आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री. तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन श्री.तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सोमनाथ माळी, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, सहायक व्यवस्थापक प्रविण अमृतराव  प्रामुख्याने उपस्थित होते.


 
Top