धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे दि. 16 आक्टोंबर 2023 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
चिकुंद्रा येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 505 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 121 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे माजी सरपंच राजेंद्र गरड, राणबा जाधवर, उपसरपंच सौ सुकेशनी मोटे, मा. उपसरपंच शाहुराज गायकवाड,शंकर मोटे, माधव मोटे, विजय गरड, सजंय मोटे, विश्वंभर मोटे, विजय गरड, सहदेव गरड, ज्योतीराम मोटे, ज्ञानेश्वर मोटे, संतोष मोटे, महादेव गरड, संजय गरड, अभंग मोटे, राम मोटे, करण गरड, लिंबराज गायकवाड, महादेव जाधव, भैरवणाथ गरड, अभिषेक गरड, अशोक गायकवाड, सुरेश गायकवाड, शंकर सर्जे, चंदन गायकवाड, मकरंद जाधवर, उमेश गरड, प्रसाद गरड इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. ओम खानापूरे, डॉ. मयुर पाटील, डॉ. शैलेश खंदारे, डॉ. धन्वी मोरे, डॉ. निधी परदेशी यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे चिकुंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्त्या राणी जाधव, शोभा ऐकंडे यांनी परिश्रम घेतले.