तुळजापूर (प्रतिनिधी)-  जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम वाया गेला असुन रबी हंगाम आशा मावळली आहे. त्यामुळे यंदा भयानक दुष्काळ परिस्थिती दिवाळी नंतर निर्माण होणार असल्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने काम सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी मंञी मधुकर चव्हान  यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देवुन केल्याची माहिती पञकार परिषद दिली.             

यावेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले कि, यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीसाठा झाला नाही उपलब्ध पाणीसाठा टिकवण्यासाठी शेतीची वीज कट केल्याने सोयाबीन, ऊसाला पाणी मिळाले नाही. उत्पादनात मोठी घट झाली. खरीपात ऐंशी टक्के सोयाबीन पेरणी झाली पण पावसामुळे शेगात माल भरला नाही. बी-बियाणे, खते, फवारणी, काढणी खर्चातुन शेतकऱ्यांना एक पै ही मिळणार नाही. उडीद, मूग गेले तूर जात आहे  या पिकांचे उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च ही निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात असून तातडीने 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाने आणि मधून तात्काळ मदत करावी. अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने रब्बी हंगामाची पेरणी होऊ शकणार नाही. जिल्ह्यातील कोणतेही धरण 100% भरलेले नाही. अनेक नद्यांना संपूर्ण पावसाळा संपला तरीही पाणी आले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी तत्काल टंचाई आराखडा मंजूर करून उपाय योजना सुरू कराव्यात असेही ते म्हणाले. यावेळी माजी जिप सभापती मुकुंद डोंगरे, युवक प्रदेश काँग्रेस सचिव अभिजीत चव्हाण उपस्थित होते.


 
Top