धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे दि. 21 आक्टोंबर 2023 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

सुरतगाव येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 415 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 65 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच द्रोपदी गुंड, उपसरपंच बुबासाहेब गुंड, मा. सरपंच नवनाथ सुरते ग्रा.प.सदस्य सागर गुंड, मा. चेअरमन धर्मराज गुंड, नवनाथ गुंड, गजेंद्र बाचरे, शहाजी पाटील, राम गुंड, बापु गुंड, विठ्ठल गुंड, हणमंत गवळी आकाश गुंड, सुरज सुरते, ग्रा.प. शिपाई राजगुमार गुंड, सौदागर गुंड, नागनाथ सुरते, नाना गुंड, सतिश धोत्रे इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. शिवम येवारे, डॉ. श्रध्दा केदार, डॉ. धनश्री गरड, डॉ. मानसी कानेरक यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top