धाराशिव (प्रतिनिधी) येणाऱ्या काळात कौशल्यपूर्ण व ज्ञान असणा-या अभियंत्यांची गरज भासणार असून चांगले अभियंते निर्माण करण्याचे काम महाविद्यालयाने करावे असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले.ते डॉ.व्ही.के.पाटील शैक्षणिक संकुलात डॉ.व्ही.के.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व एस.पी. पॉलिटेक्निक येथे अभियंता दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व नवीन विद्यार्थी स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर  शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रा.लगदिवे आर.जी , प्रा.माने एल.एम ,अभियंता रोहित पंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य अमर कवडे हे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,चांगले अभियंते तयार होणे ही काळाची गरज आहे.जर चांगले अभियंते तयार झाले तरच राज्याची आणि देशाची प्रगती होईल.जगाला दरवर्षी 4 बिलियन अभियंत्याची गरज आहे. परंतु दरवर्षी 1.5 बिलियन अभियंते तयार होतात.त्यामुळे रोजगारक्षम उद्योगासाठी अभियत्यांनी तयार होऊन उद्योजगता वाढविणे गरजेचे आहे.यावेळी  प्रा.लगदिवे आर.जी , प्रा.माने एल.एम यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रत्येक नुतन विद्यार्थ्यांचा पुस्तक देऊन स्वागत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्राचार्य अमर कवडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.व्ही.के.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व एस.पी. पॉलिटेक्निकच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top