धाराशिव (प्रतिनिधी)- तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संयोजन समिती धाराशिव यांच्या वतीने आयोजित तालुकास्तर शालेय ऍथलेटिकस क्रीडा स्पर्धेचे महेंद्र काका धुरगुडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.पदमसिंह पाटील पतसंस्थेचे चेअरमन विक्रम भैय्या पाटील,प्रमुख अथिती म्हणून रवी शितोळे, तालुका संयोजक बिभीषण पाटील,जिल्हा ऍथलेटिकस संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, जिल्हा ऍथलेटिकस संघटनेचे संचालक दिलीप चव्हाण,पवन वाठवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना महेंद्र अनेक धुरगुडे यांनी खेळाडूंना विविध विषयावर मार्गदर्शन केले तसेच खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहून मैदानासाशी मैत्री करावी व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवून खेळाडूंनी आपले व जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्वल करावे व सर्व खेळाडूंना शुभेच्या दिल्या. तसेच अध्यक्षीय समारोप प्रसंगी विक्रम भैया पाटील यांनी आरोग्य व खेळाचे माणसाच्या जीवनातील महत्व अधोरेखित केले. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी धाराशिव ते कन्याकुमारी सायकल प्रवास यशस्वी पूर्ण केल्याबद्दल अमोल माने यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
या स्पर्धेचे पंच म्हणून अजिंक्य वराळे,हरी खोटे,रोहित सुरवसे,संतोष राठोड,किरण शानमे,सुरज ढेरे,प्रभाकर काळे,योगेश माने,योगेश जगदाळे,गणेश मुळे हे काम पाहत आहेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगिनी साळुंके,प्रणिता जाधवर,देव कांबळे व ऍथलेटिकस कोचिंग सेंटर चे खेळाडू काम करत आहेत