धाराशिव (प्रतिनिधी)- कोरोनामध्ये सर्व क्षेत्र ही बंद पडलेली असताना त्या काळात देखील शेतकरी आपलं कर्तव्य पार पाडत होता व शेतीमाल विकून जगाला जगवत होता.त्यामुळे भविष्यात देखील कृषीक्षेत्र हेच कायमस्वरूपी व भविष्य असणारे क्षेत्र आहे.त्यामुळे कृषी पदवीसाठी प्रवेश मिळालेले विद्यार्थी हे भाग्यवान आहेत आणि त्यांनी पुढील काळात पदवी घेऊन केवळ नोकरीच्या पाठीमागे न लागता एक चांगला व आदर्श शेतकरी बनण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रसिद्ध लेखक,कवी,दिग्दर्शक प्रा.विशाल गरड यानी केले ते आळणी गडपाटी येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन विद्यार्थी स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजेंद्र पडवळ, इंद्रदत्त वाघ,समर्थ सिटीचे प्रमुख सचिन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर, प्रसिद्ध निवेदक दौलत निपाणीकर,उद्योजिका वर्षाराणी कूदळे,विलास शिंदे,राम गुंड हेही उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा.विशाल गरड  म्हणाले की, कृषी क्षेत्र हे सर्वांमध्ये अग्रेसर असे क्षेत्र आहे.या क्षेत्रात भविष्यात काम करत असताना व्यवसाय आणि नोकरी दोन्ही ही करता येईल मात्र विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी हा व्यवसाय म्हणून करावा आणि परिसरातील शेतकरी सधन कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावे असेही सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांना चालू तंत्रज्ञान व बदलत्या जीवनशैलीनुसार विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीन विकासासाठी योग्य ते प्रयत्न करावेत व स्वतःबरोबरच आपल्या पालकांचे महाविद्यालयाचे नाव उंचवावे असे आवाहन केले. 

यावेळी सचिन शिंदे,दौलत निपाणीकर,इंद्रजीत वाघ,प्रवीण कुमार बांगर,वर्षाराणी कुदळे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सरिता गंजे,प्रिती पाटील,समर्थ पाटील आणि ज्ञानेश्वर माळी यांनी केले तर आभार प्रा.डॉ.गांधले यांनी मानले.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील, प्रा.शेटे डी. एस., प्रा.दळवे एस.ए., प्रा.पाटील एस.एन.,  प्रा.साबळे एस.एन., प्रा.खडके एस.ए., प्रा. खरपुडे पी.सी., प्रा.खोसे पी.जे., प्रा.गार्डी ए .जी., प्रा.नागरगोजे वि.टी., महाविद्यालय व्यवस्थापक प्रा.घाडगे एच.एस., अशोक सोन्ने, दत्तात्रय घावटे तसेच कांबळे ए.बी., मेहबूब मुजावर,कोरे मावशी,संदीप वीर,आकाश गिरी यांच्यासह विद्यार्थी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 
Top