तुळजापूर (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी मातेच्या भाविकांन साठी नव्याने बांधण्यात येणारा  दर्शन  मंडप हा पुर्वपरंपरेच पालन होईल अशा जागी  बांधावा  यासाठी मंदीर परिसरात असणाऱ्या जागांचा वापर केला जावा अशा सुचना दर्शन मंडप उभारणी बाबतीत घेण्यात आलेल्या बैठकीत बहुतांशी मंडळीनी केल्या.  राज्य संरक्षित स्मारकाचा पहिल्याटप्यातील विकास आराखडा . त्याअनुषंगाने एकत्रित विकास आराखडयामध्ये नव्यानेसमाविष्टकरावयाच्या कामाच्या प्रस्तावित दर्शन मंडपाबाबत चर्चा करण्यासाठी  शुक्रवार  दि. 15 सप्टेंबर रोजी प्रशासन कार्यालय तुळजापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त योगेश खैरमाटे  तहसिलदार तथा विश्वस्त बाळासाहेब बोळंगे देविचे महंत तुकोजीबुवा महंत चिलोजी बुवा   संतोष पाटील  तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन)  वित्तवलेखा आधिकारी तथा धार्मिक व्यवास्थापक  सिध्देश्वर शिंदे सहाय्यकधार्मिकव्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले मंदीर अभियंता राजकुमार पाटील, तहसीलदार, सह तिन्ही  पुजारी मंडळ अध्यक्ष सह शहरवासिय उपस्थितीत होते.                             

या बैठकीत दर्शन मंडपात भाविकांना  जाण्यासाठी  महाध्दार मधुन प्रवेश असावा तसेच भाविकांना श्रीकल्लोळगोमुख तिर्थकुंडातुन हातपाय धुवुन स्नान करुन दर्शन मंडपसाठी जाण्यासाठी जवळ मार्ग असावा अशी सुचना केली. यावेळी बहुतांशी मंडळीनी नगरपरिषद भाजी मंडई, विजय वाचनालय, जुनी सामल धर्मशाळा त्या पाठीमागील भाग, उबंरझरा  या भागात दर्शन मंडप साठी जागा सोयीचे असेल असे यावेळी सांगितले असता यावेळी  देविचे महंत तुकोजीबुवा, यांनी  या मागील दीड एकर गायवाड्याची जागा मंदीर  दर्शन मंडपासाठी देण्यास संमती दर्शवली. यामुळे हि जागा मध्यवर्ती ठिकाणी व मंदीरकडे येणाऱ्या सर्व रस्ताचा मध्यवर्ती ठिकाणी असल्याचे यावेळी सांगितले गेले. यामुळे या भागातील पाच ते सहा ऐकर जागा विकास कामे करण्यासाठी उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे ही जागा शाषकिय असल्याने भूसंपादन खर्च वाचणार असल्याचे यावेळी निदर्शनास आणुन दिले. तर काहीनी  मोठा दर्शन मंडप करायाचा असेल ततर धाराशिव रोडवर जगदाळे वाहनतळ परिसरात तर काहीनी मातंगी देवी मंदिर मागे संभाजी प्रांगण शेजारील मोकळ्या शाषकिय जागेत  दर्शन मंडप करावा अशी सुचना केल्या .                                   

मातंगीदेवी व टोळभैरव मंदीरे आहे तिथे कायम ठेवुन उर्वरीत मोकळी जागा  वापरावयास मिळेल अशीही सुचना यावेळी करण्यात आली तर काहींनी घाटशिळ ते पालखी मार्ग पिंपळझाड  पर्यतच्या दोन्ही डोंगराचा मध्ये काही  ऐकर शाषकिय जागा उपलब्ध होत असल्याने याचा वापर विकास कामासाठी कराव्या अशा सुचना करण्यात आल्या . सदरील विकास कामे शंभर वर्ष पर्यत वापरात येतील असे करावेत अशी सुचना ही यावेळी आली

 सदरील आलेल्या सर्व सुचना लिहुन घेण्यात येवुन या सुचना विश्वस्त व विकास आराखडा बैठकीत ठेवण्यात येतील व यावर चर्चा होवुन मग दर्शन मंडप जागा कुठे बांधावयाचा निर्णय होणार आहे.

 

 
Top