धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनानिमित्त आज (दि.17) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय, धाराशिव येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व मराठवाड्यामध्ये उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रगीत गायले गेले. भारत माता की जय, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष यांनी मराठवाड्याचा हा मुक्तीदिन अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि शूर सत्याग्रहींच्या त्यागातून साकारला. मराठवाड्याचा हा मुक्तिसंग्राम स्वातंत्र्य दिन आहे. त्या सर्वांचे कृतज्ञ स्मरण आज आपण सर्व करुयात असे ते म्हणाले. या वेळी सचिन तावडे, प्रशांत फंड, सतीश घोडेराव, अतुल जगताप आदि उपस्थित होते.