धाराशिव (प्रतिनिधी)- 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव औचित्य साधून ध्वजारोहणानंतर निक्षय मित्राचा सत्कार व उपचारावर असलेल्या क्षय रूग्णांना पोषण आहार किटचे वाटप.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमती प्रांजल शिंदे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्या हस्ते क्षय रूग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी निक्षयं मित्र असलेले खालील अधिकारी प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमती प्रांजल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास, डॉ. कुलदीप मिटकरी माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. मारोती कोरे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. शिवाजीराव फुलारी निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग आधिकारी डॉ. रफीक अन्सारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. होळे, डॉ. बेटकर या उपस्थित निक्षय मित्राचा सत्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहूल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
क्षय रुग्नाना औषध उपचारा बरोबरच पोषण आहाराची आवश्यकता असते त्याकरिता अतिरिक्त साहाय्य देण्यासाठी म्हणून आपणही निक्षयमित्र बनून क्षय रुग्णांना पोषण आहार किट देऊ शकता असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव यांच्या मार्फत करण्यात आले.