धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यानगर बावी येथील उस्मानाबाद जिल्हा वसंतराव नाईक मागास समाजसेवा मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे अध्यक्ष श्री विद्यानंद मनोहर राठोड यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निमंत्रित सदस्य पदी निवड केल्याबद्दल संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद तर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक बी. यु. जगताप यांच्या शुभ हस्ते फेटा, शाल, श्रीफळ, बुके देऊन विद्यानंद मनोहर राठोड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.