धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सांगता समारंभ विविध कार्यक्रम व ध्वजारोहणासह संपन्न झाला. प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी प्रथम ध्वजारोहण केले त्यानंतर राष्ट्रगीत ,राज्य गीत व मराठवाडा गीत व सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली तर राष्ट्रध्वजाला एन.सी सी व स्काऊट गाईडच्या चमूने मानवंदना दिली.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रा. नंदकुमार नन्नवरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास आपल्या भाषणातून मुलांना उलगडून दाखवला. त्यानंतर प्राचार्यांनी केलेल्या आपल्या छोट्याखानी भाषणातून मराठवाडा मुक्ती संग्रामा सोबत दक्षिण अफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या संघर्षाची गाथा मुलांना सांगून संघर्षातूनच इतिहास घडता, त्यामुळे संघर्षाला सामोरे जा, असा मोलाचा संदेश या निमित्ताने दिला.
विविध प्रकारच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा संचालक आदित्य पाटील, सेवानिवृत्त शिक्षक गिलबिले व बोबडे आणि उपप्राचार्य एस. के. घार्गे, उपमुख्याध्यापक एस. बी. कोळी, पर्यवेक्षक वाय. के. इंगळे, एस. जी. कोरडे, श्रीमती बी .बी. गुंड, आर.बी.जाधव, के. वाय. गायकवाड, डी. ए. देशमुख तसेच पर्यवेक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख एन. एन. गोरे व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कार्यालयीन अधिक्षक घोलप सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी वाघ एस.डी व शिवाजी भोसले यांनी पाहिली व संगीत विभाग प्रमुख पाटील सर व त्यांच्या बालचमूनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर सूत्रसंचालन श्रीमती मस्के जे.बी व सूर्यकांत पाटील यांनी केले व आभार उपमुख्याध्यापक कोळी एस .बी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता शेवटी वंदे मातरम् या गीताने झाली.