धाराशिव (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस तंत्रज्ञानाची प्रगती होत असून त्यामध्ये आधुनिकतेकडे नेण्यासाठी कृषी क्षेत्रात  नाविन्यपूर्ण  अशा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाढत चाललेला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालय धारशिव मध्ये रिमोट पायलट ट्रैनिंग ऑर्गनायझशन  हे केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. 

धाराशिव येथील तेरणा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्यातील प्रशिक्षणार्थीनी प्रवेश घेऊन ड्रोन उडवण्याचा परवाना प्राप्त केलेला आहे. मराठवाड्यातील एकमेव असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असून केंद्रामध्ये आजपर्यत शासकीय तंत्रनिकेतन लातुर, शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर येथील विद्यार्ध्यांनी भेट दिलेली आहे व आपल्या तांत्रिक ज्ञानामध्ये ड्रोन संदर्भात माहिती अद्यावत केलेली आहे. 

त्या अनुषंगाने तेरणा कृषी ड्रोन प्रशिक्षण केंद्रामध्ये ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर यांच्या विद्यार्थ्यांनी तेरणा कृषी प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन ड्रोन संदर्भात विविध माहिती आत्मसात केलेली आहे. त्यांनी ड्रोन सिम्युलेटर व प्रात्यक्षिकांवर सुद्धा भर दिलेला आहे. कार्यशाळेमध्ये त्यांनी ड्रोनची विविध उपयोग विविध भाग व ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व अद्यावत तंत्रज्ञानाचा सुद्धा माहिती घेतलेली आहे. या सर्व कार्यक्रमासाठी ऑर्किड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मेतन उपस्थित होते.  तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, प्रा. ए. झेड पटेल, प्रा. उमेशचंद्र जाधव  यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. भेटीनंतर विध्यार्थ्यानी समाधान व्यक्त केले.


 
Top