धाराशिव (प्रतिनिधी)-राज्य सरकारने गॅझेटमध्ये उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद तालुका, उस्मानाबाद उपविभागीय व उस्मानाबाद जिल्हा यांचे नामांतरण केले असून, यापुढे धाराशिव शहर, धाराशिव तालुका, धाराशिव उपविभाग व धाराशिव जिल्हा म्हणून ओळखले जाईल. या दृष्टीकोनातून महसूल स्तरावर सर्वत्र धाराशिव नाव करण्याचे आदेश जिल्ह्यात देण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेच सीईओ राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात फलकाचे धाराशिव असे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी  सांगितले की, केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर तांत्रिक बदल करून अपटेड करण्यास एक-दोन दिवस जातील. त्यामुळे काही अडचण आल्यास दोन्ही नावे टाकण्यास हरकत नाही असेही सांगितले. निजाम राजवटीमध्ये धाराशिवचे नामांतर केल्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात धाराशिव करण्यासंदर्भात मागणी होती. त्यामुळे सरकारने गॅझेटमध्ये प्रसिध्दी करून उस्मानाबादचे धाराशिव नाव केले आहे. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदचे सीईओ राहुल गुप्ता यांनीही आपल्याही विभागाचे नाव यापुढे धाराशिव असेच वापरले जाईल असे सांगितले. 


मेडीकल कॉलेजच्या जागेचा निर्णय

यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी धाराशिव शहरातील गव्हमेंट मेडिकल कॉलेजसाठी जलसंपदा व आयटीआयची जागा 12 हेक्टर 64 आर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी दिली. 


 
Top