धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र सरकारने उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेऊन अधिकृत राजपत्र जारी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज (दि.16) धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आपला जीव, धाराशिव.. अशा घोषणा देत धाराशिव नामकरणाचा जल्लोष करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव यावेळी अनेक शिवसैनिकांनी धाराशिव नामातंरासाठी आंदोलने केली. मराठवाडा मुक्ती अमृत महोत्सवानिमित्त धाराशिव नामकरण झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवि वाघमारे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, सुरेश गवळी, नितीन शेरखाने, सुनील वाघ, अभिराज कदम, अजित बाकले, शिवप्रताप कोळी, संकेत सूर्यवंशी, अजिंक्य राजेनिंबाळकर, पिंटू आंबेकर, गणेश साळुंके, संदीप शिंदे, प्रभाकर राजेनिंबाळकर, सुमित बागल, सागर कोळपे, जगदीश शिंदे, गुड्डू शेख, सह्याद्री राजेनिंबाळकर, बबलू राऊत, पांडुरंग माने, धनंजय इंगळे, दीपक पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top