धाराशिव (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रिय संचार ब्यूरो सोलापूर व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने दिनांक 4 ते 8 सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगनामध्ये केंद्र शासनाची 9वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि पौष्टिक भरडधान्ये या विषयांवर आयोजन करण्यात आलेल्या डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शनाला विद्यार्थी, युवा, महिला, लोकप्रतिनिधी आणि नागरिककानी मोठ्या संख्येने भेटी दिल्या.

सदर चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे आणि क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. 

या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने मागील 9 वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती सह भारतीय भरडधान्याचा इतिहास, ऐतिहासिक नावे, विविध दुर्मिळ प्रजाती आणि आरोग्यासाठी होणारे फायदे सोबतच गरीब वंचित, आदिवासी, महिला, युवा, शेतकरी, उद्योजक यांच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, आवास योजना, पीएम श्री योजना सह आरोग्य, कृषी, पर्यावरण, क्रीडा, अवकाश आणि विविध क्षेत्रातील संशोधन या क्षेत्रामधील प्रगती व विकासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची आणि कल्याणकारी व लोकाभिमुख योजनांची माहिती चित्र, मजकूर, डिजिटल स्क्रीन आणि एल ई डी टीव्हीच्या माध्यमातून नागरिकांना बघण्यासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी केंद्र शासनाच्या 9 वर्षातील कामगिरीवर लोकांनी समाधान व्यक्त केले.

पौष्टिक भरडधान्ये, राष्ट्रीय पोषण महिना आणि केंद्र शासनाने माघील 9 वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने  मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली.

या प्रदर्शनाच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने नागरिकांचे निःशुल्क आरोग्य तपासणी करण्यात आले. यामध्ये रक्तदाब, शुगर आणि सीबीसी या तपासण्या करण्यात आले. तसेच आभा कार्डमध्ये या तपासण्याची नोंदी करण्यात आले.आयुष्यमित्राकडून आयुष्यमान भारत योजना विषयी माहिती देण्यात आली. तुळजापूर येथील महिषासुरमर्दिनी सांस्कृतीक कला पथकाने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. प्रदर्शनाच्या आयोजनासाठी केंद्रिय संचार ब्यूरोचे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, योगीनंद कोंडाबतीन, सूरज जाधव आणि साईराज राऊळ  आदींनी परिश्रम घेतले.    


 
Top