धाराशिव (प्रतिनिधी)- एस.पी.शुगर अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या 6 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ क्रीडा व युवक कल्याण,बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा आज 29 सप्टेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे,सुरेश बिराजदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी 2 हजार 800 रूपये हा कमीत कमी  भाव जाहीर केला.

पुढे बोलताना मंञी बनसोडे म्हणाले कि, शासन सहकारी साखर कारखान्याना जी काही  मदत लागेल ते मदत करण्याचे काम सुद्धा भविष्यकाळामध्ये होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे यावर्षी पीक नुकसान झाले आहे.ज्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाईसुद्धा पीक विम्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.म्हणून शेतकरी बांधवांना कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही.विजेच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय सुद्धा शासन लवकरात लवकर घेत आहे. असेही बनसोडे यावेळी म्हणाले.


 
Top