तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे 7/9/22 ते 14/9/23 या कालावधीत हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालच्या वरीष्ठ व कनिष्ठ हिंदी विभागाच्या माध्यमातून यावेळी दोन तुतारी भित्तिपत्रिकांचे प्राचार्य डॉ. मणेर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले.  

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले की, आधुनिक व विज्ञान युगात भाषा भेद समाजास पोषक नाही,कारण भाषा ज्ञान प्राप्त करण्याचे माध्यम आहे. ज्ञान हे साध्य आहे, हिंदी भाषेचा अंगीकार संत नामदेवांनी देखील केला होता,कारण वारकरी संप्रदायातील अध्यात्म त्यांना इतर भाषेत घेऊन जायचे होते. संत कबीरदास, संत तुलसीदास, गुरु गोविंदसिंग यांनी देखील हिंदी भाषेच्या माध्यमातून आपल्या मानवतेवर आधारित अध्यात्मिक तत्वांचा प्रचार केला.हिंदी भाषेची स्वतंत्रपूर्व काळात महत्वाची भूमिका दिसून येते. ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी एकमात्र भाषा म्हणजेच हिंदी भाषा होय.आणि आजही हिंदी भाषेचे हे कार्य अविरत चालू आहे. जसे बच्चे अस्पताल में ऑक्सीजन की कमी से दम तोड रहे हैं, नेता कुर्सी के होड में आपस में लड रहे हैं,ही वास्तविकता हिंदी भाषेतुन चपखल व्यक्त होते, किंवा पारिवारिक रिश्तों में इतनी दरारें पड़ गई है,आज अपने ही घर में हम अजनबी बन गए हैं,खऱ्या अर्थाने आज हिंदी भाषा आज आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनली आहे,आपण किती तरी जाहिराती हिंदी भाषेतुन बघत असतो त्याचा प्रभाव आपल्या समाजावर होतच असतो,एखादा प्रेमी जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा तो म्हणतो की, बीमारी में तुम्हारी याद दवा की तरह कारगर हुई, जैसे पंछियों को धूप में छांव मददगार हुई, अशा भावना आपण हिंदी भाषेत व्यक्त करत असतो.आज बैकींग क्षेत्रात, अनुवाद क्षेत्रात, रेडिओ क्षेत्रात खुप मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मिती होत आहे, त्यामुळे हिंदी भाषेचा देखील आपण गंभीर पणाने अभ्यास करणे गरजेचे आहे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रा धनंजय लोंढे, डॉ. एम.आर. आडे, प्रा. जे.बी. क्षीरसागर, प्रा.वसावे, प्रा.व्ही.एच. चव्हाण, मेजर डॉ. वाय. ए. डोके यांच्या सह सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top