तुळजापूर (प्रतिनिधी) -1913 साली भारतीय सिनेमाची दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र सिनेमा निर्माण करुन मुहूर्त मेढ रोवली. हा पहिला मूक चित्रपट होता ही भारतीय सिनेमाची खरी नांदी होती. 1913 ते 1918 या कालावधीत त्यांनी 23 चित्रपट निर्माण केले. 1964 मध्ये राजश्री प्रोडक्शन खाली ताराचंद बडजात्यांनी दोस्ती चित्रपटाची हिंदी भाषेत निर्मिती करुन हिंदी चित्रपट सृष्टीला एक नवी दिशा दिली. हिंदी चित्रपटात समाजातील वास्तविकता दाखवली जाते. भारतीय सिनेमा भारतीय संस्कृती व परंपरेचे संवाहक आहे असे प्रतिपादन कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले.

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांचे भारतीय सिनेमा व हिंदी भाषा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार डॉ. एम. आर. आडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर डॉ. वाय. ए. डोके, डॉ. रामा रोकडे यांच्या सह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top