तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर शहरासह तालुक्यात महालक्ष्मी पुजन सोहळा शुक्रवार  (दि. 22)  रोजी संपन्न झाला. 

शुक्रवारी (दि. 22)  घरोघर  सांयकाळी  महालक्ष्मीस   नैवध दाखवुन  पूजन करुन  भरपूर पाऊस पडून दुष्काळ संकट दूर कर  असे साकडे भक्तांनी घातले. श्री तुळजाभवानी मातेस महालक्ष्मीगौरी पुजन दिना निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेस  सुवर्ण अलंकार घालण्यात आले होतेफ तर राजे शहाजी महाध्दारावर भव्य फुलांचा हार भाविकांचा वतीने घालण्यात आला होता.


 
Top