तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरात श्रीगणेशाचे चतुर्थी दिनी मंगळवारी (दि. 19) रोजी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. घरगुती गणपतीचे मुहुर्त साधुन प्रतिष्ठापनि केली प्राणप्रतिष्ठापना शहरातील काही सार्वजनिक गणेशमंडळांनी मिरवणूक काढुन तर काहीनी साधेपणाने  पहाटे ते दुपार पर्यत प्रतिष्ठापना केली. सकाळ पासुन श्रीगणेश मूर्ती खरेदीसाठी गणेश भक्तांनी बाजारपेठेत  गर्दी  केली होती. तसेच श्रीगणपती पुजेसाठी लागणाऱ्या  साहित्य खरेदीसाठी  बाजारपेठेत  मोठी गर्दी केली होती.

श्री तुळजाभवानी मंदिरातील गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना दुपारी मंदिरात लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे व सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक तथा लेखापाल सिध्देश्वर इंतुले यांच्या हस्ते विधी करण्यात आली.   यावेळी महेश आदमाने, विश्वास परमेश्वर, अनिल चव्हाण, जयसिंग पाटील, गणेश नाईकवाडी, तिरुपती वाघे, संकेत वाघे, संदीप वाघे, सचिन सांळुके सह पुजारी व भाविक वृंद उपस्थितीत होते.पावणारा गणपतीमुर्तीची प्रतिष्ठापना पहाटे नगराध्यक्ष सचिन रोचकरी त्यांच्या सौभाग्यवतींचा हस्ते करण्यात आली. ग्रामीण भागात ही गावोगाव श्री गणपती मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.


 
Top